सोशल मीडिया द्वारे स्त्री सशक्तीकरण कसे होऊ शकते?- Smartphone Entrepreneur

पूर्वी बिझनेस म्हणलं कि लोकांचा डोळ्यासमोर मार्केटिंगचा मोठा खर्च उभा राहायचा. जाहिरात म्हणलं कि मोठे होआरडींग डोळ्यासमोर यायचे. पण आजच्या डिजिटल जगामध्ये ह्या गोष्टी खूप सोप्या झाल्यात. तुमच्याकडे जर एखाद स्किल असेल तर तुम्ही त्याच्यावर तुमचा बिझनेस सुरु करू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तो बिझनेस सहज लोकांपर्यंत पोचवू शकता. आज हे शक्य आहे कारण डिजिटल माध्यमांमुळे जग खूप छोट झालय. स्मार्ट फोन्स मुळे संपूर्ण जग आपल्या खिशात बसण्यासारखे झाले आहे. मग तुमचा बिझनेस का ऑनलाईन नको व्हायला?

फेसबुक , ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, इत्यादी हे नव्या जगातले नवे शब्द आहेत. पण ह्या शब्दांमुळे महिला सशक्तीकरण पण होऊ शकते असे आत्ताच कळून येत आहे.


सोशियल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग हे शब्द आपण पुष्कळ वेळा ऐकतो पण ते आपण कसे वापरू शकतो हे समजत नाही . बहुतेक जणांसाठी फेसबुक हे माध्यम फक्त फोटो शेर करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. परंतु महिला उद्योजकांसाठी हा प्लॅटफॉर्म अतिशय उत्तम पद्धतीने बिझनेसच्या मार्केटिंग साठी वापरला जाऊ शकतो. विशेषतः फेसबुक ग्रुप्स मध्ये महिला एक मेकांशी मनमोकळ्या बोलू शकतात. एक मेकांचे प्रॉब्लेम्स सोडवू शकतात. बऱ्याच महिला ग्रुप्स च्या माध्यमातून आपले उद्योग यशस्वीपणे चालवतात. बऱ्याच महिला घरून आपले बिझनेस चालवतात. महिलांना सशक्त व्हायचा असेल तर आर्थिक रित्या स्वतःच्या पायांवर उभा राहणं अतिशय महत्वाचे असते. जर तुमच्या मनात स्वतःचा बिझनेस चालू करण्याची इच्छा असेल तर फेसबुक हे साधन तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल.

फेसबुक मार्केटिंग कसे करावे?

१.. सर्वप्रथम तुम्ही एक फेसबुक प्रोफाइल तयार करावी.

२. आपल्या बिझनेस चे फेसबुक पेज तयार करावे. पेज मधून तुम्हाला तुमचा बिझनेसची जाहिरात करता येते.

३. तुमच्या पेज वर तुमच्या बिझनेस शी संबंधित माहिती तुम्ही पोस्ट करू शकता. पेज चा वापर करून तुम्ही पुष्कळ लोकांनपर्यंत मोफत पोचू शकता.

४. फेसबुक ग्रुप्स हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमचा बिझनेस ची जाहिरात करण्यासाठी.

५. फक्त पुण्याचा महिलांसाठी मी पुणेरी ठसका नावाचा ग्रुप तयार केला आहे. तो ग्रुप तुम्ही जरूर जॉईन करावा. ह्या ग्रुप मध्ये प्रत्येक शनिवार व रविवारी जाहिराती पोस्ट करता येतात.

६ फेसबुकवर आपण आपल्याला असलेलं ज्ञान लोकांबरोबर शेर करता येते.

७. तुमच्या फेसबुक पेजवरून तुम्ही इव्हेंट्स तयार करून ते लोकांपर्यंत पोचवू शकता.

८. बऱ्याच महिला घरून ऑर्डर्स घेतात आणि कुरिअर ने जगभरात त्यांचे प्रॉडक्ट्स पाठवू शकतात. कमीत कमी खर्चात बिझनेस सेट होऊ शकतो. ९. पुष्कळ महिला घरून कपडे, पर्सेस ,फराळ, खाण्याचे पदार्थ , घरगुती जेवण, लिखाणाचे काम, सजावटीच्या वस्तू इत्यादी बिझनेस करतात. घरच्या सर्व जवाबदाऱ्या सांभाळून बिझनेस करणाऱ्या अशा पुष्कळ महिला पुण्यातच नव्हे तर भारतात सुद्धा आहेत.

नौकरी म्हणलं कि बांधिलकी येते. सुट्ट्या मिळत नाहीत. त्यामुळे बऱ्याच महिला घरून बिझनेस करण्याकडे वळतात. पूर्वी जी लोकांपर्यंत पोचण्याची समस्या होती ती आता फेसबुक मुळे नाहीशी झालीये. एक बटण दाबले कि तुम्ही हजारो लोकांपर्यंत तुमचा बिझनेस पोचवू शकता.


“पुणेरी ठसका” हा फेसबुक group खास पुण्याचा महिलांसाठी बनवा गेला आहे. ह्याचीच एक ब्रांच ‘ द लेडी बॉसेस ‘ हि महिलांना ऑनलाईन बिझनेस चे ट्रैनिंग देण्यासाठी तयार केली आहे. द लेडी बॉसेस चे ट्रैनिंग फेसबुक वरच होते. अशा प्रकारे फेसबुक चा उपयोग शिक्षणासाठी पण होऊ शकतो. आम्ही फेसबुकचा वापर महिला सशक्तीकरणासाठी करतो. ह्या फेसबुक ग्रुप द्वारे पुष्कळ महिलांना आर्थिक मदत होते व त्या आपल्या पायावर स्वतंत्रपणे उभे राहण्याची संधी मिळते.

सोशल मीडिया चा वापर केवळ बिझनेस साठीच नव्हे तर जनजागृती साठी पण करता येतो. पुष्कळ महिला आपले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी फेसबुक चा वापर करतात.
सोसिअल मीडिया मुळे आज जग खूप छोटे झाले आहे. . तुम्ही पृथ्वीच्यापाठीवर कुठल्याही कोपऱ्यातून तुमची माहिती जगासमोर मांडू शकता. आणि ते पण मोफत! सामाजिक समस्या, त्यांचे उपाय, त्यांच्याबद्दल चर्चा , स्वास्थ्य व आहार, इत्यादी विषयांवर चर्चा होऊन समाजात जागरूकता पसरते. बातम्या काही मिनिटात जगाचा एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोचतात.

ह्या सगळ्याचा अर्क असा आहे कि आजचया डिजिटल जगात महिलांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घ्यावा. हीच वेळ आहे स्वतःला स्वतंत्र व सशक्त करण्याची . हि संधी सोडू नका.

लेखिका – डॉ श्वेता काकडे पोतदार

संस्थापक – द लेडी बॉसेस अकॅडमी

Email- theladybossentrepreneur@gmail.com